सावंतवाडी : सप्टेंबर महिन्यात १५ दिवस बँका बंद राहणार; महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी असेल ? जाणून घ्या…

शेअर करा

सावंतवाडी,दि.०२ सप्टेंबर

सप्टेंबर २०२६ मध्ये देशातील विविध राज्यांमध्ये बँका एकूण १५ दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये नियमित रविवार आणि दुसरा व चौथा शनिवारचा समावेश आहे. याशिवाय विविध राज्यांमधील स्थानिक सण, उत्सव आणि विशेष प्रसंगांमुळे काही दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्टीची तारीख तपासणे महत्त्वाचे आहे.

सप्टेंबर मध्ये रविवार आणि शनिवारची सुट्टी कधी ?

सप्टेंबर २०२६ मध्ये ६, १३, २० आणि २७ सप्टेंबर या तारखांना रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. याशिवाय १२ सप्टेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार, तर २६ सप्टेंबर हा चौथा शनिवार असल्याने या दोन्ही दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. याशिवाय विविध राज्यां मध्ये स्थानिक सण आणि विशेष प्रसंगां मुळे पुढील तारखांना बँका बंद राहणार आहेत…

राज्यनिहाय बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

४ सप्टेंबर : जन्माष्टमी
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, दिल्ली आणि गोवा वगळता इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

११ सप्टेंबर : जयपूर महानगरपालिका निवडणूक
जयपूरमध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमुळे शहरातील सर्व बँका बंद राहतील.

१२ सप्टेंबर : श्रीमंत शंकरदेव तिरोभाव तिथी
आसाममध्ये श्रीमंत शंकरदेव यांच्या तिरोभाव तिथीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. याच दिवशी देशभर दुसऱ्या शनिवारची नियमित सुट्टीही आहे.

१४ सप्टेंबर : गणेश चतुर्थी आणि इतर सण
महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, गोवा आणि आंध्र प्रदेशमध्ये गणेश चतुर्थी, गणेश पूजा, वारसिद्धी विनायक व्रत, विनायक चतुर्थी आणि हरतालिका तीज यांसारख्या सणांमुळे बँका बंद राहतील.

१५ सप्टेंबर : संवत्सरी, नुआखाई आणि गणेश चतुर्थी
गुजरातमध्ये संवत्सरी, ओडिशामध्ये नुआखाई महोत्सव, तर गोव्यात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसानिमित्त बँका बंद राहतील.

२१ सप्टेंबर : स्थानिक धार्मिक उत्सव आसाममध्ये श्रीमंत शंकरदेव आणि केरळम ध्ये श्री नारायण गुरु समाधी महोत्सवानिमित्त बँकांना सुट्टी असेल…

२२ सप्टेंबर : कर्मा पूजा झारखंड मध्ये कर्मा पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहतील…

२३ सप्टेंबर : महाराजा हरि सिंह जयंती जम्मू आणि काश्मीर मध्ये महाराजा हरि सिंह यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल…

२५ सप्टेंबर : इंद्रजात्रा सिक्कीममध्ये इंद्रजात्रा उत्सवा निमित्त बँका बंद राहतील…

ओडिशा आणि गोव्यात सलग दोन दिवस बँका बंद…

सप्टेंबर मध्ये ओडिशा आणि गोवा या राज्यां मध्ये स्थानिक सणांमुळे सलग दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी या दोन्ही राज्यांमध्ये गणेश चतुर्थी आणि गणेश पूजे मुळे बँकांना सुट्टी असेल. यापूर्वी १२ सप्टेंबरला दुसऱ्या शनिवारची सुट्टी असल्याने या राज्यां मध्ये बँकिंग व्यवहारांचे नियोजन करताना ग्राहकांनी तारखा लक्षात घेणे आवश्यक आहे…

आसाम आणि केरळमध्येही सलग दोन दिवस सुट्टी…

आसाम आणि केरळम ध्ये २० आणि २१ सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस बँका बंद राहतील. २० सप्टेंबरला रविवारची सुट्टी आहे. त्यानंतर २१ सप्टेंबरला स्थानिक धार्मिक उत्सवा मुळे आसाम आणि केरळ मधील बँका बंद राहणार आहेत…

सिक्कीममध्ये सलग तीन दिवस बँका बंद…

सिक्कीम मध्ये सप्टेंबरमध्ये बँकांना सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. २५ सप्टेंबर रोजी इंद्रजात्रेमुळे बँका बंद राहतील. त्यानंतर २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील. म्हणजेच सिक्कीममध्ये २५, २६ आणि २७ सप्टेंबर असे सलग तीन दिवस बँकिंग सेवा बंद राहणार आहेत…

🔴महत्त्वाची सूचना

बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन करावयाचे व्यवहार, कर्जाचे काम, चेक जमा करणे किंवा इतर महत्त्वाचे काम असल्यास सुट्टीच्या तारखांची आधीच खात्री करून घेणे योग्य ठरेल. ऑनलाइन बँकिंग, UPI आणि मोबाइल बँकिंग सारख्या डिजिटल सेवा मात्र संबंधित बँकेच्या उपलब्धतेनुसार सुरू राहू शकतात…

शेअर करा