कणकवली : भाजप पक्षातील लोकप्रतिनिधीनी कोकणवासीयांना धमकावून नये – परशुराम उपरकर

शेअर करा

विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध ;ठाकरे शिवसेना खंबीरपणे पाठीशी राहील..

कणकवली,दि.२६ जून

भाजप पक्षातील लोकप्रतिनिधी कोकणवासीयांना धमकावून विनाशकारी प्रकल्प लादण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या धमक्यांना कोकणवासीयांनी घाबरू नये. विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध असून जनतेच्या पाठिशी ठाकरे शिवसेना खंबीरपणे उभे राहिल. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अणू ऊर्जा प्रकल्पांसारखे खा. नारायण राणे यांनी आणण्यापेक्षा राणेंनी केंद्रीयमंत्री असताना ओरोस येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा हाती घेतलेला हा प्रकल्प पूर्ण करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह््यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करू द्यावा, असे आव्हान ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले.


येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अणू ऊर्जा प्रकल्प विरोधकांना फटकावले पाहिजे, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य लोकशाही विरोधी असून हुकूमशाहीसारखे आहे. सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी जनतेला धमकावण्याची भाषा करीत आहेत. त्यांची कृती लोकशाही तुडवून हुकूमशाहीसारखी आहे, अशी टीका उपरकर यांनी केली.


सिंधुदुर्ग जिल्ह््यातील देवगड तालुक्यातील मुगणे गावात औष्णिक प्रकल्प लादण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. हा प्रकल्प होण्यासाठी जनतेला धमकवण्याचे काम सुरू आहे. कोकणातील विनाशकारी प्रकल्पामुळे आंबा, काजू बागायतीसह शेती, मत्स्य संपदाचा उद्ध्वस्त होईल. कोकणात या प्रकल्पांमूळे प्रदूषण होऊन त्यांचा त्रास कोकणवासीयांना होईल, असे उपरकर म्हणाले.


खा. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह््यासाठी काय दिले, ? असा सवाल त्यांनी केला. सत्ताधारी पक्षांतील लोकप्रतिनिधी हे गुंडप्रवृत्तीप्रमाणे वागत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या धमक्यांना जनतेने घाबरून न जाता कोकणातील विनाशकारी प्रकल्पांना तीव्र विरोध करावा. जनतेच्या विरोधाला ठाकरे शिवसेना खंबीरपणे साथ असेल, असे परशुराम उपरकर यांनी म्हटले.

शेअर करा