मालवण,दि.०४ जुलै
मालवण रेवतळे येथे सुरु असलेल्या उमेश चव्हाण मित्रमंडळ मालवण आयोजित पावसाळी रब्बल बॉल क्रिकेट स्पर्धेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी विशेष उपस्थिती लावत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उमेश चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने उमेश चव्हाण यांच्या हस्ते माजी आ. वैभव नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उमेश चव्हाण यांनी दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतील संघ व खेळाडू सहभागी होत असून, ग्रामीण भागातील नवोदित क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगितले
यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावना वाढीस लागते असे सांगून या स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन कौतुकास्पद असल्याचे नमूद करत, उपस्थितांनी केलेल्या सन्मानाबद्दल वैभव नाईक यांनी उमेश चव्हाण मित्रमंडळाचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अवधूत मालवणकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, स्वप्निल आचरेकर, स्पर्धेचे आयोजक उमेश चव्हाण, सुनील मालवणकर, कल्पेश रोगे, सचिन गिरकर, रुपेश करलकर, आशिष शेलटकर, पायस आल्मेडा, साई हळदणकर, अमित हळदणकर, अमेय मांजरेकर, मेलविन फर्नांडिस, विशाल लुडबे, डॅनिस फर्नांडिस, नेव्हिल तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.