सावंतवाडी,दि.०४ जुलै
रेडी येथील श्री माऊली विद्यामंदिर प्रशालेचच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून ,प्रशालेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक ,अभिनंदन होत आहे.
या प्रशालेतून इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून,यातील तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
या प्रशालेतील कु.समर्थ दिपक राणे (५९.३३% )गुण मिळवून तालुक्यात आठवा, कु.प्राची शंकर गवंडी (५८.६ %) तालुक्यात नववी तर कु.प्रांजल ज्ञानेश सावंत (५७.३%) गुण मिळवत तालुक्यात दहावी आली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी माजी उपसरपंच दीपक राणे,शंकर गवंडी,
ज्ञानेश सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक कुणाल बांदेकर, श्रीम.पेडणेकर, लिपिक उमेश कर्णेकर, गौरव येसजी, गोविंद चिपकर तसेच प्रशालेचे विद्यार्थी , कर्मचारीवर्ग उपस्थित होते.