कणकवली : कळसुलीत ज्येष्ठाची गळफास घेत आत्महत्या

शेअर करा

कणकवली ,दि. २० ऑगस्ट

कळसुली-गांगोसकलवाडी येथील परशुराम भिकाजी घाडीगावकर (वय ८७) यांनी गांगो मंदिर पसिरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दुपारी २ वाजता उघडकीस आली. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
परशुराम घाडीगावकर हे गेले काही दिवस दम्याच्या आजाराने त्रस्त होते. गुरुवारी त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. याबाबत हनुमंत भिकाजी घाडीगावकर (६१ मूळ रा. कळसुली-गांगोसकलवाडी, सध्या रा. कलमठ-गुरववाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

शेअर करा