महिलांना दीड हजार देऊन आता महागाई करत लूट चालू आहे ; राज्यात ५१ लाख महिला ठरल्या अपात्र…
कणकवली,दि. ०९ जून (Sindhudurg Sanvad Digital News Network)
महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना १५०० रुपये देऊन लाडकी बहीण आणली.आता केवायसी करत ५१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच २१ हजार शासकीय आणि निमशासकीय महिलांनी लाभ घेतला आहे.१६ हजार पुरुष लाभार्थी आढळले आहेत.त्यांची आता वसुली होणार आहे.महिलांना दीड हजार देऊन महागाई करत लूट चालू आहे . महायुती सरकारने महागाईच्या खाईत लोटले असल्याचा आरोप शिवसेना नेते,माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात जो काळा पैसा वाटायचा होता, ती लाडकी बहीण योजना आणून व्हाईट पैसे वाटले.त्यामुळे महिलांनी मते घातली.आता त्यांना महागाईने पश्चाताप झाला आहे.घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ झाली आहे.कडधान्य,भाज्या व जीवनावश्यक वस्तूंची वाढ झाली आहे.त्यामुळे महिलांचा बजेट कोडमोडला असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.
आता शाळा सुरु झाल्यामुळे मुलांसाठी वह्या, ड्रेस वाढलेले आहेत,एका बाजूने महिलांना १५०० रुपये सरकार देत आहेत.दुसरीकडे महागाईतून महिलेकडून ३ हजार काढत आहे. आता सोने दीड लाख रुपये आणि चांदी दोन लाख पन्नास हजार झाली आहे.संपूर्ण राज्यात महागाई निर्माण झाली आहे.सरकारने लाखों रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे.जनता आता भडकलेली आहे,त्या जनतेने पैसे वाटपाकडे पाठ फिरवून योग्य पद्धतीने महागाई विरोधात मतदान करण्याची गरज असल्याचे मत परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले.
सरकार जनतेला शासकीय सुविधा देऊ शकत नाही. शासनाची व्यवस्था कोडमोडलेली आहे.सरकार कडून गरीबांना महागाईच्या खाईत लोटले जात आहेत,गरीबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे धोरण केलं असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.