सावंतवाडी,दि.०४ जुलै
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोली शाळेतील विद्यार्थ्यी कॅडेट भूषण पवार व कॅडेट गौरांग पेडणेकर यांनी शिष्यवृत्ती मिळवून सातत्यपूर्ण निकालाची परंपरा कायम राखली. पूर्व माध्यमिक परीक्षेत या विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त करून शालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.गुणवंत विद्यार्थ्यांचे विस्तार अधिकारी सौ.भावना गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. संस्था अध्यक्ष श्री.सुनील राऊळ, सचिव जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ,प्राचार्य नितीन गावडे यांनी यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक अरुण गावडे,परमेश्वर सावळे,मनोज देसाई, दत्ता वावधने यांचे कौतुक केले.