तळेरे : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी प्रविण अर्जुन वरुणकर यांची निवड

शेअर करा

तळेरे,दि.०४ जुलै

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी तळेरे गावचे माजी सरपंच आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रविण अर्जुन वरुणकर यांची निवड करण्यात आली आहे.
प्रविण अर्जुन वरुणकर हे पहिल्यापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत पक्षाच्या पडत्या काळातही पक्षावरची निष्ठा ढळू दिली नाही. पक्षाशी प्रामाणिक राहून संघटनेचे कार्य सातत्याने करीत राहिले. याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी त्यांचे अभिनंदन करुन पक्ष संघटनेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल प्रविण वरुणकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा