गोंधळी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत; कार्यकर्त्यांची उपस्थिती
कणकवली,दि.१६ ऑक्टोंबर
जयभवानी गोंधळी समाज संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. जयभवानी गोंधळी समाज संघाचे अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे आणि उपाध्यक्ष शिवाजी भिसे यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत केले.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख दामोदर सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अखिल भारतीय गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे, सचिव वैभव इंगळे, शिवाजी वाघमारे, प्रेम कासले, नागेश सूर्यवंशी, कृष्णा इंगळे, महेश कांबळे, विशाल इंगळे, राजू भिसे, अनिल इंगळे, शंकर वाघमारे, करण सूक्तेकर, रोशन इंगळे, वेदांत कांबळे, रोहित ननवरे, प्रथमेश इंगळे यांच्यासह जयभवानी गोंधळी समाज संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या भेटीदरम्यान समाज संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.