कणकवली : आरोग्यवर्धिनी समिती सदस्यपदी संदेश पारकर

शेअर करा

कणकवली,दि.२२ जुलै

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक तथा शासनाच्या समितीचे सचिव डॉ. श्रीपाद पाटील यांनी १५ जुलै रोजी अधिकृत पत्राद्वारे पारकर यांना नियुक्ती कळवली आहे. राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विभागांमध्ये समन्वय तसेच जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे कार्यभार सांभाळणार असून, समितीमध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नियुक्तीमुळे कणकवलीचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय आरोग्यविषयक निर्णय प्रक्रियेत होणार आहे.

शेअर करा