सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत द्वितीय क्रमांक; शिक्षक समीर चांदरकर व प्रा. प्रवीण परुळेकर यांचे मार्गदर्शन
मालवण, दि. ३० ऑक्टोबर
सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी कु. रुचिता चंद्रशेखर वराडकर हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी तिला सहाय्यक शिक्षक श्री. समीर चांदरकर व प्रा प्रवीण परुळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, सचिव श्री. सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई , सहसचिव श्री. साबाजी गावडे मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे , पर्यवेक्षक महेश भाट तसेच संस्थेच्या सर्व संचालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रुचिताने मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.