कणकवली : २ ऑक्टोबरला ‘नो UPI’चा व्यापाऱ्यांचा इशारा

शेअर करा

UPI व्यवहारांवरील प्रस्तावित MDR शुल्काला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा विरोध

कणकवली ,दि.२९ सप्टेंबर

UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या प्रस्तावित निर्णयाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने २ ऑक्टोबर रोजी ‘नो UPI’ आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

या दिवशी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारचे व्यवहार केवळ रोखीने करावेत, असे आवाहन महासंघाने केले आहे. ग्राहकांकडून ऑनलाइन (UPI) द्वारे पैसे स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारण्यास व्यापाऱ्यांचा विरोध असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.

UPI व्यवहारांवर ०.८ टक्के MDR (Merchant Discount Rate) लागू करण्याच्या प्रस्तावित निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडू नये, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

“आमचा UPI ला विरोध नाही; मात्र आर्थिक भुर्दंड व्यापाऱ्यांवर पडू नये,” अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने घेतली आहे.

२ ऑक्टोबर रोजी ‘नो UPI’च्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा