कणकवली : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सभेत तुळशीदास रावराणे यांचा सत्कार

शेअर करा

कणकवली,दि.०६ जुन
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची सर्वसाधारण सभा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथे पार पडली.
या सभेमध्ये सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. तसेच कार्यकारी संचालक तथा सदस्य सचिव संजय कदम यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सदस्य आ. चरणसिंग ठाकूर, पदसिद्ध सदस्य दिपक तावरे (भा.प्र.से.), सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, पदसिद्ध सदस्य सूरज मांढरे (भा.प्र.से.), आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, पदसिद्ध सदस्य तथा नाबार्ड प्रतिनिधी, पुणे, सदस्य संजय काजळे (पाटील), सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर (जि. बुलढाणा), सदस्य नारायण बाजीराव पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा (जि. धुळे), सदस्य प्रविणकुमार नाहाटा, सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे, पदसिद्ध सदस्यृ शरद जरे, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, सदस्य सचिव संजय कदम, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, मा.पणन मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील, पणन सहसचिव विजय लहाणे, सरव्यवस्थापक मा. विनायक कोकरे, रत्नागिरी विभागीय उपसरव्यवस्थापक मा मिलिंद जोशी, कोल्हापूर विभागीय उपसरव्यवस्थापक श्री. घुले व इतर विभागीय उपसरव्यवस्थापक तसेच पणन मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त संचालक तुळशीदास रावराणे यांनी राज्य शासन व पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानून राज्यातील शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समित्या व कृषी पणन व्यवस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदासाठी आपल्या नावाची शिफारस केल्याबद्दल मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच कोकणचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खा. नारायण राणे यांचे विशेष आभार व्यक्त केले.

शेअर करा