Kudal news:कुडाळ रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून ठाकरे सेना आक्रमक

शेअर करा

दिवाळीपूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी ;अन्यथा ठाकरे सेना आंदोलन छेडणार

कुडाळ,दि.२७ऑक्टोंबर

कुडाळ शहरातून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याविषयी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयावर धडक दिली. कुडाळ रेल्वेस्टेशनकडून जाणारा रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गणपती सणापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, अद्याप हा रस्ता जैसे थे परिस्थितीत असून दिवाळी सणापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. जर रस्त्याचे काम दिवाळी सणापूर्वी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, ठाकरे सेना शहर प्रवक्ते बाळा पावसकर, अमित राणे, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, गुरु गडकर, संदीप महाडेश्वर, गोट्या चव्हाण, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संजय बोभाटे, शैलेश जळवी
आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा