कुडाळ : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलतर्फे २० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

शेअर करा

कुडाळ,दि.०२ ऑगस्ट

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने तसेच आयपीडीजी (IPDG) रो. अरुण भंडारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुलभता मिळावी या उद्देशाने २० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.

या वितरण सोहळ्यास क्लबचे अध्यक्ष रो. दीपक आळवे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, चार्टर प्रेसिडेंट डॉ. प्रशांत कोलते, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, सेक्रेटरी रो. म्हाडदळकर, आयपीपी रो. राजीव पवार, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे रो. ललित वंजारे, रो. व्यंकटेश घोगळे, रो. गौरव घोगळे, रो. विवेक राणे, आयपीपी रो. अरुण मालणकर, ओसरगावचे उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामपंचायत सदस्या वंदना पारकर, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे तसेच ग्रामस्थ आणि लाभार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मान्यवरांनी मुलींच्या शिक्षणासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढून त्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लाभार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी रोटरी क्लब आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलतर्फे २० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने तसेच आयपीडीजी (IPDG) रो. अरुण भंडारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुलभता मिळावी या उद्देशाने २० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.