मालवण: सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भव्य रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबिर

शेअर करा

३ ऑगस्ट रोजी दैवज्ञ भवन येथे राजकोट मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम; रक्तदानासह मोफत नेत्रतपासणीची सुविधा

मालवण,दि.२१ जुलै

मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून राजकोट मित्रमंडळ यांच्यावतीने दि. ३ ऑगस्टला सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत दैवज्ञ भवन येथे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजात रक्ताचा असणारा तुटवडा दूर व्हावा आणि गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी या उदात्त हेतूने या संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान करा, जीवनदान द्या” या संदेशासह गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध असणार आहे.

राजकोट मित्रमंडळाद्वारे सर्व नागरिक, तरुण वर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे व आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा