मालवण नगरपरिषदेकडून सिंगल युझ प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाई

शेअर करा

मालवण ,दि.१३ जुलै

मालवण नगरपरिषद हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील भाजी मार्केट, फळ विक्रेते, किराणा दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन एकूण रु. ६,६०० इतका दंड वसूल करण्यात आला.

सदर मोहीम मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्रीमती संध्या गवळी व स्वच्छता निरीक्षक श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत नगरपरिषदेचे मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत तपासणी व जनजागृती केली. तसेच व्यापारी व नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

मालवण शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल युझ प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन नगरपालिकेतर्फे कार्ब्यात आले आहे.

मालवण नगरपरिषदेकडून सिंगल युझ प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाई

मालवण (प्रतिनिधी)