राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण; शाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी, अपघाताचा धोका वाढला
सावंतवाडी, दि.०३ जुन
नेमळे तील सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था
नेमळे गावातील वाडीतून गेलेले ग्रामीण रस्ते तळवडे, मळगाव, कमळेवीर वेंगुर्ला, झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्ग यांसर्व मुख्य रस्त्याना जोडण्यात आले आहेत यात राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामपंचायत कडे जाणारा मुख्य रस्ता, ग्रामपंचायत ते दलित वस्ती पर्यंत, पाटकर वाडी ते कमळेवीर तळवडे रस्ता या रस्त्यावरून गावातील तसेच इतर दुचाकी चार चाकी, अवजड वाहन चालकांची सतत ये जा चालू असते या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे आता थोड्याच दिवसात शाळा सुरु झाल्यावर शाळकरी मुले शाळेत जात येत असताना वाहन चालक रस्त्यावरील खड्डे चुकवीताना जीव घेणे अपघात होण्याची शक्यता आहे यासाठी नेमळे ग्रामपंचायतीने संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी पाठ पुरावा केला मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केला आहे , लवकरात लवकर यां सर्व रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नेमळे ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांजकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. न पेक्षा आठ जून रोजी गावातील सर्व ग्रामस्थाकडून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी नेमळे , उपसरपंच सखाराम राऊळ, एकनाथ राऊळ, विक्रम पांगम,मिलिंद नेमळेकर तसेच इतर उपस्थित होते