उपजिल्हा रुग्णालयात पेढे वाटून आनंदोत्सव
सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न अखेर सुटल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर उपजिल्हा रुग्णालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रुग्णकल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी यांनी दीपक केसरकर यांच्यासह सर्वांचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले, २०१८ मध्ये आमदार दीपक केसरकर यांनी या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मोठा निधी मंजूर करून आणला होता. टेंडर देखील काढलं गेलं होत. परंतु, जागेच्या प्रश्नांमुळे हे रुग्णालय खोळंबल होत, पुढील प्रक्रिया थांबली होती. अखेर तो प्रश्न मार्गी लागल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सावंतवाडीसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. या लढ्यात आणि मंजुरी मिळवून देण्यात स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी अपार मेहनत घेतली. त्यामुळे या सर्व यशाचे श्रेय त्यांनाच जाते. तसेच, या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक प्रशासन आणि पाठपुरावा करणाऱ्या सर्व जनतेचे व राजघराण्याचे आभार मानतो अशी भावना श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, मेहर पडते, सुरज मठकर, वसंत सावंत, ॲड. प्रसाद नाटेकर, भास्कर आमुणेकर, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.