सावंतवाडीत २५ आणि २६ ऑगस्टला रानभाज्या व गावठी वस्तूंचा महोत्सव

शेअर करा

​सावंतवाडी ,दि. २० ऑगस्ट
पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध औषधी, गुणकारी व पौष्टिक रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे दोन दिवसीय ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या २५ आणि २६ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत पार पडणार आहे.


​पावसाळी ऋतूत निसर्गातून मिळणाऱ्या रानभाज्यांचे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्व असते. या भाज्यांची माहिती व उपलब्धता एकाच छताखाली व्हावी, यासाठी नगरपरिषदेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


​या महोत्सवात स्थानिक विक्रेत्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, तसेच शहरातील व परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औधकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आणि उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.

शेअर करा