सावंतवाडी, दि. १७ जुलै
सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक व पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
याशिवाय शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री, सुनील नाईक, हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, भारती परब, राजश्री निर्गुण, नीलम कुमठेकर आदींसह पक्षाचे अन्य कार्यकर्ते आणि पालिकेचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.