​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून मध्यम मुदतीचा अंदाज जाहीर

शेअर करा

सावंतवाडी,दि.२ जुलै
भारतीय कृषी हवामान शास्त्र विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा (०४ ते ०८ जुलै २०२६) मध्यम मुदतीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सांख्यिकीय हवामान अंदाज (NWP) मॉडेलवर आधारित या वृत्तानुसार जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी २४ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


​पाच दिवसांचा सविस्तर पावसाचा अंदाज:
​हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाचही दिवस पावसाचे प्रमाण जोरदार राहील. यामध्ये ५ जुलै रोजी सर्वाधिक म्हणजे ८७ मि.मी. पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संपूर्ण ५ दिवसांच्या कालावधीत आकाश पूर्णपणे ढगाळ राहणार आहे.


​पावसामुळे जिल्ह्यातील कमाल तापमानात किंचित घट होऊन ते २७ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण सकाळी ९० ते ९५ टक्के, तर दुपारच्या सत्रात ८३ bags ते ८५ टक्के इतके उच्च राहणार असल्याने वातावरणात प्रचंड दमटपणा जाणवेल.


​पश्चिम-नैऋत्येकडून वेगवान वारे वाहणार:
​या कालावधीत वाऱ्याची दिशा मुख्यत्वे पश्चिम-नैऋत्येकडून राहणार असून वाऱ्याचा वेग ताशी १७ ते २४ किलोमीटर इतका राहील. विशेषतः ६ जुलै रोजी वाऱ्याचा वेग सर्वाधिक (२४ किमी/तास) राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमार व शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा