सावंतवाडी: नेमळे शिक्षण संस्थेत देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

शेअर करा

ध्वजारोहणानंतर समूहगीत स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या मधुर देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला

सावंतवाडी,दि. १६ ऑगस्ट

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा व देशभक्तीपर समूहनृत्य स्पर्धा संपन्न झाली.
नेमळे शिक्षण संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच नववीतील मुलांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे अनावरण डाॅ.हेमंतकुमार सावंत व घनश्याम आळवे यांच्या हस्ते करण्यात आले.पाचवी ते आठवी लहान गट व नववी ते बारावी या मोठ्या गटात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मधुर स्वरात देशभक्तीपर गीत गाऊन वातावरण देशभक्तिमय केले.प्रत्येक देशभक्तीपर गीताला विद्यार्थ्यांनी , पालकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
लहान गटात आठवी अ -प्रथम ,द्वितीय क्रमांक- सातवी, तृतीय क्रमांक- आठवी ब
मोठ्या गटातून प्रथम क्रमांक – दहावी – अ, द्वितीय क्रमांक- दहावी – ब, तृतीय क्रमांक- नववी – अ च्या मुलांनी प्राप्त केला.
तसेच देशभक्तीपर समूहनृत्यामध्ये प्रथम क्रमांक सहावीतील मुलांनी प्राप्त केला. द्वितीय क्रमांक -सातवी व तृतीय क्रमांक पाचवीतील मुलांनी प्राप्त केला.
यास्पर्धेचे परीक्षण ॲड सिध्दी परब यांनी केले.ज्ञानेश नाईक , नितिन धामापूरकर, एकांक्ष राऊळ, मंगेश परब यांनी संगीत साथ दिली.
संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ सर, सचिव पांडुरंग दळवी, मुख्यकार्यकारी अधिकारी र.वि.प्रभूतेंडोलकर, तुकाराम गुडेकर, प्रभाकर गावडे, प्रभूतेंडोलकर, घनश्याम आळवे, गुरुदास वाघाटे, प्राचार्य आर.के.राठोड, ॲड सिध्दी परब यांच्या हस्ते यशप्राप्त मुलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राजेश गुडेकर, एम.पी.सारंग, उमेश राऊळ, सी.टी.बंगाळ, नेत्रा चव्हाण, क्रांति मयेकर, एन.कडावलकर, आरती कोरगावकर, सगुण नेमण, दिलीप मेस्री, तुकाराम घोगळे इत्यादी उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले.आभार लवू जाधव यांनी मानले .

शेअर करा