सावंतवाडी : कारिवडे ग्रामपंचायतीतर्फे गुणवंत विद्यार्थी, आजी-माजी सैनिक व पोलिसांचा गौरव

शेअर करा

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य कार्यक्रम; गावातील गुणवंतांचा जाहीर सत्कार करून केला सन्मान

सावंतवाडी,दि. १६ ऑगस्ट

ग्रामपंचायत कारिवडेच्या वतीने ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावात एका भव्य आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी, आजी-माजी सैनिक आणि पोलिस बांधवांचा जाहीर सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थी आणि सैनिकांचा सन्मान
विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल कारिवडे गावातील जिल्हा परिषद शाळेतील ६० विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. तसेच देशाच्या आणि राज्याच्या सेवेसाठी योगदान देणाऱ्या कारिवडे गावातील सर्व आजी-माजी सैनिक, कार्यरत व निवृत्त पोलिस कर्मचारी आणि वीरपत्नी मिळून सुमारे ११० जणांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना प्रेरित केले.
मान्यवरांची मांदियाळी
कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सौ. प्राजक्ता केळुसकर (पंचायत समिती सदस्य) सौ. आरती अशोक माळकर (सरपंच, कारिवडे गाव), महेश गावकर (उपसरपंच) तुकाराम आमुणेकर (ग्रामपंचायत सदस्य)सौ. प्रतिभा जाधव (ग्रामपंचायत सदस्य)
सौ. तन्वी साईल (ग्रामपंचायत सदस्य)श्रीम.भाग्यश्री भारमल (ग्रामपंचायत सदस्य) श्रीम. नेहा परब (ग्रामपंचायत सदस्य)श्री. शंकर मेस्त्री (अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती कारिवडे)श्री. अशोक माळकर (भाजपा उपाध्यक्ष, आंबोली मंडळ) माजी सरपंच श्री.तानाजी साईल, श्री. आत्माराम साईल (माजी सैनिक) श्री. लक्ष्मण सावंत (माजी सैनिक)
श्री. संजय सावंत (माजी सैनिक)
श्री. लक्ष्मण गवळी (माजी सैनिक)
श्री. महादेव माळकर (चेअरमन, कारिवडे सोसायटी)
श्री. रविंद्र ठाकुर (व्हाईस चेअरमन, कारिवडे सोसायटी)
श्री. सोनु सावंत (संचालक, कारिवडे सोसायटी)
श्री.भरत बुंदे (ग्रामपंचायत अधिकारी),श्री.प्रदिप केळुसकर, पोलिस पाटील कारिवडे,सौ.श्रुती सिद्धेश गोसावी,भैरववाडी पोलिस पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचलन प्रसिद्ध कवी मनोहर परब यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार अशोक माळकर यांनी मानले. हा सोहळा कारिवडे गावकऱ्यांच्या देशप्रेमाची आणि एकतेची साक्ष देणारा ठरला.

शेअर करा