सावंतवाडी,दि.२२ जुलै
सावंतवाडी नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी भावपूर्ण पुष्पांजली अर्पण केली.
या प्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.