Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेकडून लॉन मोअर मशीन खरेदी; मैदानावर शुभारंभ!

शेअर करा

टर्फ विकेटवरील गवत कापण्यासाठी मशीनचा होणार वापर; खेळाडू व क्रीडाप्रेमींकडून समाधान व्यक्त!

सावंतवाडी ,दि.२२ ऑक्टोंबर

सावंतवाडी नगरपरिषदकडून लॉन मोअर खरेदी करण्यात आला असून आज प्रत्यक्ष मैदानावर त्याचा शुभारंभ करण्यात आला. या मशीनचा टर्फ विकेटवरील लॉन कटिंगसाठी वापर होणार असल्याने खेळाडू व क्रीडा प्रेमींतून समाधान व्यक्त केले जात आहे.

या मशीनच्या सहाय्याने आज जिमखाना मैदानावर प्रत्यक्ष लॉन कटींगला सुरुवात करण्यात आली. यावेळी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांच्यासह जिमखाना मैदानावरील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी क्रीडा सभापती श्री. आडीवरेकर यांनी या लॉन मोअर मुळे लॉन कटींग सहजतेने होणार आहे. तसेच टर्फ विकेटवरील काम देखील येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून यामुळे खेळाडूंना मैदानावर सराव करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

शेअर करा