सावंतवाडी,दि.१९ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत शाळा तळवणे नं. ४ येथील विद्यार्थिनी कु. श्रावणी शिवाजी कवडे हिने सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध स्पर्धा परीक्षांमधील तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विनोद झेंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच श्रावणीच्या आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि परिश्रम यांचा मोठा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू वैज तसेच केंद्रप्रमुख श्रीम.मुळे यांनी कु. श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या