सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रात एकल महिलांचे सर्वेक्षण; २५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२० ऑगस्ट
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या (नवी मुंबई) निर्देशानुसार, सावंतवाडी नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व एकल महिलांचे सर्वेक्षण आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र एकल महिलांनी आपली नावे २५ ऑगस्ट पर्यंत नगरपरिषदेत नोंदवावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
​या सर्वेक्षणांतर्गत महिलांचे संपूर्ण नाव, एकल महिलेचा प्रकार, वय, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, शिक्षण, उदरनिर्वाहाचे साधन, मासिक उत्पन्न, दिव्यांगत्वाची माहिती, कुटुंबातील सदस्य संख्या, दारिद्र्यरेषेखालील नोंद, बचत गट सदस्यत्व आणि शासकीय योजनांचा लाभ इत्यादी माहिती संकलित केली जाणार आहे.
​सदर सर्वेक्षण प्रक्रियेसाठी पात्र महिलांनी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औधकर, महिला व बालकल्याण सभापती श्रीम. दिपाली भालेकर आणि उपसभापती श्रीम. सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.
​पात्र एकल महिलांनी आपली नावे दि. २५ ऑगस्ट पर्यंत सौ. परविन शेख यांच्याकडे जमा करावयाची आहेत, अशी माहिती नगरपरिषद कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

शेअर करा