सावंतवाडी : सोनुर्लीतील जाधव कुटुंबावर काळाचा घाला; आईच्या निधनाने हसता-खेळता संसार उद्ध्वस्त

शेअर करा

करासवाडा येथे मृतावस्थेत आढळलेल्या अजय जाधव आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा अर्थव यांच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

सावंतवाडी,दि.२८ जून

करासवाडा येथील भाड्याच्या खोलीत शनिवारी सकाळी सापडलेल्या सोनुर्ली येथील अजय देऊ जाधव व त्याचा सात वर्षाच्या मुलगा अर्थव या बाप- लेकाचा मृतदेहावर रविवारी दुपारी सोनुर्लीत शोकाकुल वातावरणात अत्यसंकार करण्यात आले. तर मृत्यूशी झुंज देण्यार्या अजय हिची पत्नी सुवर्णा जाधव हिचेही मंगळवारी दुपारी उपचार सुरु असतांनाच निधन झाले. त्यामुळे हसता खेळता संसार पुर्णतः उद्धस्त झाला. आज बाप लेकाचे मृतदेह जाधववाडी येथील घरी आणताच कुंटूबिय आणि नातेवाईकांडून एकच टाहो फोडण्यात आला.यावेळी सर्वाची मने सुन्न झाली.
सोनुर्ली येथील अजय जाधव हा नोकरी निमित्त म्हापसा करासवाडा येथे गेली वर्षभर भाडयाच्या खोलीत पत्नी व सात वर्षाच्या मुलासोबत राहत होता. शनिवारी सकाळी या बंद खोलीत अजय मुलगा अर्थव या दोघांचे मृतदेह आढळून आले होते तर पत्नी सुवर्णा हि अत्यवस्थ स्थितीत बाजुलाच आढळून आली होती.
या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती. ही सामूहिक आत्महत्या की घातपात याबाबत याबाबत काहीच समजू शकले नव्हते. म्हापसा पोलिसाकडून याबाबत सखोल तपास सुरु आहे.
मात्र अजूनही काहीच समोर आलेले नाही. दरम्यान पत्नी सुवर्णा (वय ३०) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचाराकरिता गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचार सुरू असतांच तिचे दुपारनंतर निधन झाले. तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली. आज दुपारी अजय व मुलगा अर्थव या दोघांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांचे मृतदेह जाधववाडी येथे घरी आणताच कुंटूबिंयाकडून आणि नातेवाईकाकडून एकच टाहो फोडण्यात आला. चिमुकल्या अर्थवचा निपचित पडलेला मृतदेह पाहून सर्वांचीच मने सुन्न झाली होती आणि ग्रामस्थांकडून तोंडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
अजय या सुशिक्षित मुलगा होता. तो खासगी बॅकेत नोकरी करत होता. ज्या ठिकाणी तो राहत होता. तेथील राहणीमानसुद्धा चांगले होते. कुंटूबात कधीच भांडण वैगरे काहीच नसायचे मात्र असे असतांना जर अजय याने कुंटूबासहीत सामुहिक आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर तो का? असे एवढे काय घडले असावे की त्याच्यावर हि वेळ आली. कि हा घातपात तर नाही ना? असा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. हे सर्व कोडे सोडविणे आता पोलिसासमोर मोठे आव्हान आहे. अजय याची पत्नी हीची मृत्यूची झुंज सुरु होती तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असती तर हे सगळे कोडे सुटले असते. मात्र तिचेही निधन झाल्याने आता हे कोडे सुटणे अवघड बनले आहे. म्हापसा पोलिस आता नेमका कसा तपास करुन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन उलगडा करतात हे पाहवे लागणार आहे.

शेअर करा