फोंडाघाट : शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाटचा यशाचा मान; जिल्हा गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

शेअर करा

फोंडाघाट, दि. ४ जुलै

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

           पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी स्वरूप शशिकांत सागांवकर याने ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ३५ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले.तसेच पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत कु. हर्षा केशव गोसावी हिने ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. कु. सन्वी विजय पाटील हिनेही ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यात २० वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळविले.

               विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. म. ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. वि. रा. तायशेटे, शाळा समितीचे चेअरमन मा. श्री. द. दि. पवार, सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा