सिंधुदुर्ग : वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईपोटी 400 शेतक-यांना 54 लाखांची मदत

शेअर करा

कणकवली वनपरिक्षेत्रातील 460 प्रकरणांपैकी 400 प्रकरणे निकाली; शेतक-यांनी नुकसानींचे प्रस्ताव दाखल करावेत

सिंधुदुर्ग,दि.०५ सप्टेंबर

महाराष्ट्र वन विभागाच्या कणकवली वनपरिक्षेत्रांतर्गत १ एप्रिल २०२५ ते १ जुलै २०२६ या कालावधीतील वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीपोटी गेल्या वर्षभरात ४६० प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी ४०५ प्रकरणे स्वीकारण्यात, तर ५५ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. नुकसान भरपाई पोटी 400 शेतक-यांना 54 लाख 84 हजार 716 रुपये मदत मिळाली आहे. त्यामुळे शेतक-यांनी वन्य प्राण्यांकडून मनुष्य आणि फळझाडे किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्यास त्याचा ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सुहास पाटील यांनी केले आहे.

वन विभागाच्या अहवालानुसार एकूण ४०० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, केवळ ५ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेली एकूण रक्कम ५४ लाख ८४ हजार ७१६ रुपये इतकी आहे.
प्रकारनिहाय पाहता, ऊस पिकाशी संबंधित ३६ प्रकरणांपैकी ३१ प्रकरणे स्वीकारण्यात आली असून ३१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. त्यासाठी ३ लाख ४९ हजार ८४७ रुपये अदा करण्यात आले आहेत. पिकांच्या नुकसानीशी संबंधित १३३ प्रकरणांपैकी १२७ प्रकरणे स्वीकारण्यात आली असून १२५ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. या प्रकरणांसाठी ७ लाख ४२ हजार ४२३ रुपये अदा करण्यात आले आहेत. तसेच फळबागांच्या नुकसानीची १४६ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी १२२ स्वीकारण्यात, २४ नामंजूर करण्यात आणि १२० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. फळबागांसाठी १७ लाख ९१ हजार १९६ रुपये अदा करण्यात आले आहेत.

पाळीव प्राण्यांच्या नुकसानीपोटी त्यात गाय, म्हैस, रेडा, बैल या प्रकारातील ९१ प्रकरणांपैकी ७६ प्रकरणे स्वीकारण्यात आली असून ७६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यासाठी ११ लाख ७१ हजार १२५ रुपये अदा करण्यात आले आहेत. तर मेंढी, बकरी मृत्यू प्रकारातील ५१ प्रकरणांपैकी ४७ स्वीकारून ४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून ४ लाख ३० हजार १२५ रुपये अदा करण्यात आले आहेत. दरम्यान, मनुष्य गंभीर जखमी या प्रकारातील ३ प्रकरणांपैकी २ प्रकरणे स्वीकारण्यात आली असून त्यातील २ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यासाठी १० लाख रुपये अदा करण्यात आल्याचे सुहास पाटील यांनी सांगितले.

बॉक्स –
नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी वनविभागाची तत्परता –
कोकणात माकड ,गवारेडे , रानटी डुक्कर , हत्ती, बिबट्या यांच्यासह विविध वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता ब-याच ठिकाणी माकडांच्या उपद्रवामुळे भातशेती करण्याकडे शेतक-यांनी दुर्लक्ष केला आहे. तसेच अन्य भाज्या व इतर लागवट करताना शेतक-यांसमोर नुकसानीचा प्रश्न निर्माण होतो. परंतु, वनविभागाकडून झालेल्या नुकसानीबाबत मदत केली जाते. याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात कणकवली वनक्षेत्रपाल कार्यालयातून तब्बल 400 शेतक-यांना नुकसान भरपाईपोटी मदत करण्यात आल्याने वनविभागाची तत्परता दिसून येत आहे.

वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईपोटी 400 शेतक-यांना 54 लाखांची मदत

कणकवली वनपरिक्षेत्रातील 460 प्रकरणांपैकी 400 प्रकरणे निकाली; शेतक-यांनी नुकसानींचे प्रस्ताव दाखल करावेत

सिंधुदुर्ग: