१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत योगेश ताम्हणकर याचा तृतीय क्रमांक
कट्टा, दि. ०५ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मा. श्री. संजय आग्रे मित्र मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने मा. संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा – २०२६ आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील एकूण सहा विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी मिळालेल्या या व्यासपीठाचा विद्यार्थ्यांनी उत्साहाने लाभ घेतला.
दरम्यान, १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. योगेश राजन ताम्हणकर याने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत योगेशने आपल्या वेगवान धावण्याचे कौशल्य दाखवत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
योगेशला या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक प्रा. श्री. कविटकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर योगेशने हे यश संपादन केले. त्याच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे.
योगेश ताम्हणकर याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सन्मा.विश्वस्त, अध्यक्ष, सचिव,सर्व संचालक, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही त्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असून, अशा जिल्हास्तरीय स्पर्धांमुळे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. योगेशच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
महाविद्यालयाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यात येत असून, भविष्यातही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करावी