सिंधुदुर्ग : अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि. १९ ऑगस्ट

मराठा समाजातील महिलांबाबत नवनाथ वाघमारे याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा अखिल भारतीय मराठा सेवा संघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. समाजातील महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा संघटनेनेच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.
मराठा समाजातील तरुणींबाबत श्री. वाघमारे यांनी केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह असून, अशा वक्तव्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवण्याची गरज असताना जाणीवपूर्वक समाजातील महिलांबाबत असे वक्तव्ये करणे निषेधार्ह आहे.
मराठा समाज नेते लवू वारंग, एस. टी. सावंत आणि एस. एल. सपकाळ यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात वाघमारे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. प्रत्येक समाजातील महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही समाजाच्या महिला अथवा समाजघटकांबाबत अवमानकारक वक्तव्ये करू नयेत. वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी खेद व्यक्त करत शासनाने योग्य ती दखल घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल मराठ सेवा संघाच्यावतीने लवू वारंग, एस. टी. सावंत, एस. एल. सपकाळ,निळकंठ वारंग, अविनाश राणे, लक्ष्मण पावसकर यांनी केले आहे.

शेअर करा