सिधुदुर्ग: स्वयंसेवक पदासाठी ५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन

शेअर करा

सिधुदुर्ग,दि.०१ ऑगस्ट

भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयतर्फे स्वयंसेवक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
जिल्ह्यातील युवक वा युवतींना www.nyks.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दिनांक ५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. 
या पदासाठी शिक्षण कमीत कमी १० वी पास व वयोमर्यादा दि. १ एप्रिल, २०२५ रोजी १८ पेक्षा जास्त व 29 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी कामगार असू नये, स्वयंसेवक मानधन दर महा 5000/- आहे. स्वयंसेवक हा त्याच तालुक्यातील रहिवासी असावा. पगाराची नोकरी नाही किंवा स्वयंसेवक कायदेशीररीत्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. 
अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०५ ऑगस्ट, २०२६ असेल अधिक माहितीसाठी मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी १० ते सायं ५) मोबाईल नं. ९४२१२६७०११ संपर्क साधावा.

शेअर करा