शिवकालीन इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि वंचितांच्या वेदनांना साहित्यरूप देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गोविंदराव मोहिते यांनी गौरव
मुंबई,दि.०१ ऑगस्ट
साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून शिवकालीन इतिहास,संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि पददलित,पीडितांच्या वेदना साहित्यातून तंतोतंत मांडल्या म्हणूनच आज ते थोर व्यक्तिमत्व ठरले आहेत,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल संघ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भावांजली वाहताना म्हटले आहे.
त्यापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे अध्यक्ष, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
रा.मि.म.संघ वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने विधान परिषदेचे उपनेते मा.सचिन अहिर यांच्या प्रेरणेने आज परेल येथील मनोहर फाळके सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि वाचन प्रेरणादिन संपन्न झाला.
याप्रसंगी प्रारंभी स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्त्रोत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण सेक्रेटरी साई निकम,लेखक काशिनाथ माटल,ग्रंथपाल ममता गा
घाडी,अशा आसबे,रामचंद्र दुखले,श्रावणी पवार,प्रांजली शिंदे आदींनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखन तसेच कामगार चळवळ विषयक विचारांवर प्रकाशझोत टाकला.याप्रसंगी कलावंत के.राघवकुमार, संघटनेचे सेक्रेटरी शिवाजी काळे,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड आदी मान्यवर उपस्थित होते.वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने वाचनात सातत्य टिकविणा-या वाचकांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला