वेंगुर्ला ,दि.२५ जुलै (प्रथमेश गुरव)
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील शेणई बालवाडीच्या छोट्या मुलांनी वारकरी दिंडी काढत ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष केला.
गावडेश्वर मंदिर ते सुंदरभाटले येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा केलेले मुलगे आणि मुली, शिक्षक आणि पालक सहभागी झाले होते. विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन दिंडीची सांगता करण्यात आली. बालवाडीच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.