वेंगुर्ला : पावसाळा सुरू होताच छत्र्यांच्या डॉक्टरांना मागणी; रेनकोटलाही पसंती

शेअर करा

जुन्या छत्र्यांच्या दुरुस्तीकडे नागरिकांचा वाढता कल; बाजारपेठेत पावसाळी साहित्याची लगबग

वेंगुर्ला,दि.०३ जुलै

अलिकडे अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसापासून संरक्षणासाठी छत्र्या, रेनकोट तसेच जुन्या छत्र्या दुरूस्त करणारे छत्र्यांचे डॉक्टरही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. नागरिक जुन्या छत्र्या आणून त्या दुरूस्त करून घेत आहेत.
यावर्षी एक महिना विलंबाने पावसाला प्रारंभ झाला आहे. मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या पार्·ाभूमीवर बाजारपेठेत रेनकोट आणि छत्र्या दाखल झाल्या आहेत. मागील वर्षापासून सुमारे शंभर रूपये किंमतीचे रेनकोर्ट नागरिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर जुन्या छत्र्या दुरूस्त करून घेण्याकडेही नागरिकांचा कल दिसून येत आहे. वेंगुर्ला बाजारपेठेत अशा छत्र्या दुरूस्त करणारे डॉक्टरही उपलब्ध झाले आहेत.

शेअर करा