आचरा : भटक्या जनावरांबाबत आचरा ग्रामपंचायत ऍक्शन मोडवर

शेअर करा

जनावर मालकांची भेट घेत दिले कारवाईचे संकेत

आचरा,दि. १० जून (अर्जुन बापर्डेकर )

पावसाळा सुरु होऊनही जनावरे मोकाट सुटलेली असल्याने वाहतूकीस अडथळ्याबरोबर अपघात ही होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. याबाबत आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस आणि सहका-यांनी कडक धोरण अवलंबत पशुपालकांच्या घरी भेट देत
सायंकाळी गुरे गोठ्यात न दिसता मोकाट आढळल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत. यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्यासह उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,महेंद्र घाडी,पंकज आचरेकर,योगेश गावकर,अनुष्का गांवकर, किशोरी आचरेकर,पुर्वा तारी,श्रृती सावंत,सायली सारंग,सारीका तांडेल,यांसह आचरा पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच जयप्रकाश परुळेकर,पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांसह अन्य आदी सहभागी झाले होते.


आचरा ग्रामपंचायत तर्फे मोकाट जनावरांबाबत तीन महिन्यांपूर्वीच जनावरे मोकाट आढळल्यास कारवाईचे संकेत दिले होते. याबाबत संपूर्ण गावात ध्वनीक्षेपकावरुन ग्रामस्थांना सुचित करण्यात आले होते. मात्र काही दिवस वगळता गुरांबाबत पशुपालकांकडून बेफिकीर पणा होऊ लागला.यातच रात्रौच्या वेळी आकस्मिक गुरे समोर आल्याने अपघाताचेही प्रकार घडू लागले होते. त्यामुळे मंगळवारी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस आणि सहका-यांनी कडक धोरण आखत पशुपालकांच्या घरी जात कारवाईचे संकेत दिले.

शेअर करा