उद्या सकाळी 9 वाजता NSS विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग
आचरा ,दि.१३ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत उद्या दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता आचरा पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम आचरा ग्रामपंचायत आणि आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या मोहिमेत महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समुद्रकिनारा आणि परिसर स्वच्छ करण्यासोबतच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त परिसर याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.
सर्व ग्रामस्थ, युवक आणि वाचनप्रेमींनी या देशभक्तीपर आणि सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.