Devgad News :मोर्वे हिंदळे येथील दिनेश मोर्वेकर यांचे आकस्मिक निधन!

शेअर करा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित; देवगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद!

देवगड,दि. ३१ ऑक्टोबर
मोर्वे हिंदळे येथील दिनेश यशवंत मोर्वेकर (५१) यांचे शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्वे हिंदळे येथील दिनेश मोर्वेकर यांना मागील दोन वर्षापूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. तेव्हापासून ते वरचेवर आजारीच होते. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची तब्बेत जास्त बिघडल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद अरुण सदाशिव मोर्वेकर (६६, मोर्वे हिंदळे) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार विनीता भुजे करीत आहेत.

शेअर करा