आचरा देवूळवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या घटनेने कानविंदे कुटूंबावर मोठे संकट
आचरा,दि.०६ जुन अर्जुन बापर्डेकर
आचरा देवूळवाडी येथील अनंत उर्फ सुरेश गणपत कानविंदे यांच्या घरावर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घरापाठीमागिल अंबाडीचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने घराला पोटमाळा असल्याने आत झोपलेल्या मंडळींना कोणतीही दुखापत झाली नाही.मोठा आवाज झाल्याने गडबडून उठलेल्या कानविंदे यांना घराच्या नुकसानीने मोठा धक्काच बसला.
ऐंन पावसाळ्याच्या तोंडावरच झालेल्या या घटनेने
कानविंदे यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.