आचरा : प्रत्येक जण कृषीसज्ञान झाल्यास पर्यावरण संवर्धन होण्यास वेळ लागणार नाही –साहित्यिक सुरेश ठाकूर

शेअर करा

आचरा दि.०४ जुलै (अर्जुन बापर्डेकर)

प्रत्येक वृक्षातील औषधी गुणधर्म मानवाच्या जीवनात उपयोगी ठरत आसतात.मात्र याबाबत योग्य ती माहिती मिळाल्यास प्रत्येक वृक्षाचे जतन होऊन पर्यावरण संवर्धन होण्यास वेळ लागणार नाही.यासाठी कृषीविषयक पुस्यकांचे वाचन प्रत्येकाने करणेआवश्यक असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले.


शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी,संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, श्रीमती वैशाली सांबारी, भिकाजी कदम,वनराई संस्थेच्या गौरी मायनाक,शिवराम म्हापणकर, तसेच मांगिरीष सांबारी,रामेश्वर वाचन मंदिर सांस्कृतिक समिती सदस्य श्रद्धा महाजनी, ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री,स्वप्नील चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना सुरेश ठाकूर यांनी रामेश्वर वाचन मंदिरात उपलब्ध असलेल्या ५००च्यावर कृषी विषयक पुस्तकांमधील दहा पुस्तकांबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.यात
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देणारे शेतकरी मासिक, आवळा वृक्ष अमृताचा , फुलले ऋतू , बहुगुणी वेली , सेंद्रिय परसबागेतील फुलझाडे लागवड , वनस्पती औषधे, दिव्यऔषधी वनस्पती, पुष्पौषधी, आरोग्य आणि वनस्पती , किती चतुर या वनस्पती, गणेश पूजेतील औषधी वनस्पती आदी कृषीविषयक पुस्तकांची माहिती देत कृषी विषयक पुस्तकांचे जास्तीत जास्त लोकांनी वाचन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.वनराई आणि एचडीएफशी परीवर्तन संस्थेच्या गौरी मायनाक यांनी आपल्या संस्थेचे उद्दिष्ट आणि उपक्रमांची माहिती देताना गावागावात कृषी साक्षरता आणि उद्योग साक्षरता निर्माण करण्यासाठी आमची संस्था कार्यरत असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिप सदस्या वर्षा सांबारी यांच्या परसबागेत फुलझाडे आणि वनौषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.

शेअर करा