दोडामार्ग : सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर (IPS) यांची दोडामार्ग पोलीस ठाण्यास भेट; विविध महत्त्वाच्या विषयांवर आढावा

शेअर करा

दोडामार्ग दि.०४ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर (IPS) यांनी शनिवारी दोडामार्ग पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दोडामार्ग तालुक्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन विकास आणि पर्यटकांच्या सुरक्षेचे नियोजन, वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच प्रलंबित पोलीस ठाण्याच्या मंजुरीचा पाठपुरावा या विषयांवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, पोलीस विभागातील सुविधा आणि मनुष्यबळ, तसेच पोलीस व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली.
या भेटीमुळे दोडामार्ग तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यासोबतच पर्यटन सुरक्षेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा