आचरा : ग्रामपंचायत आचरा येथे १ जुलै रोजी एनसीएमसी कार्ड शिबिर

शेअर करा


आचरादि.२९ जून,(अर्जुन बापर्डेकर)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने
आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी
(एनसीएमसी) कार्ड सुरू केले आहे.हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे. यादृष्टीनेच जेष्ठ नागरिकांना सदर कार्ड उपलब्ध व्हावे या हेतूने
आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामपंचायत आचरा येथे बुधवार १जुलै रोजी सकाळी दहा वाजता जेष्ठ नागरिक आचरा यांच्या साठी नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . यासाठी सेवाशुल्क २२०असून सोबत येताना आधारकार्ड आणि लिंक केलेला मोबाईल घेऊन येण्याचे आवाहन आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी केले आहे.

शेअर करा