तोंडवळी मुंजाचे बाग येथ उभारला स्वखर्चातून साकव
आचरा,दि.१८ सप्टेंबर (अर्जुन बापर्डेकर)
तोंडवळी मुंजाचे बाग येथे साकव नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते. लोकांची गरज ओळखून मालवण पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून साकव उभारून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.गुरुवारी गणेश तोंडवळकर यांच्या हस्ते साकवाचे लोकार्पण झाले
या साकवामुळे ग्रामस्थांची ये-जा करणे सुकर होणार असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या लोकार्पण सोहळ्यावेळी माजी सरपंच
राजन वराडकर प्रसाद मसुरकर
प्रमोद ताडेल,सचिन बागवे,रामजी बागवे ,मंगेश ताडेल तेजू पोयरेकर
सर्वेश पेडणेकर
पोयरेकर,मुंज वहिनी
महाकाळ ,तसेच मुंबईतील सर्व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
मुजाचे बाग वाडीतील साकव बनवणे याभागातिलत्यासाठी उपयोग रेशन दुकानावर जाणाऱ्या लोकांसाठी तसेच गणपती उत्सवासाठी आलेल्या लोकांना ये जा करण्यासाठी गणपती मध्ये सर्व लोकांना आरतीला जाण्यासाठी रात्रीला भरपूर त्रास सहन करावा लागत होता तेथील ग्रामस्थांनी मला सांगितलं की जरा कोणत्याही परिस्थितीत गणपतीच्या अगोदर हा आमचा शाखा बांधून देण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे मी न शब्द दिला होता की गणपतीच्या अगोदर बांधून देतो त्याप्रमाणे काल मी त्या साकवाच लोकार्पण केलं
तोंडवळी मुंजाचे बाग येथे गणेश तोंडवळकर यांनी स्वखर्चातून साकवाचे बांधकाम पूर्ण केले. या साकवाचा लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणेश तोंडवळकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
गावातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे, हीच खरी सामाजिक सेवा आहे. याच भावनेतून गणेश तोंडवळकर यांनी स्वखर्चातून साकव उभारला, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
साकवाच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी गणेश तोंडवळकर यांचे विशेष आभार मानत त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आ
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जनतेची सेवा, विभागाचा विकास हेच आपले ध्येय आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या प्रमाणात विकासनिधी मतदार संघात प्राप्त होत आहे. गतिमान विकास सुरु आहे. या जनसेवेच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा या भावनेतून आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली साकव उभारणी केली आहे.