आचरा पिरावाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

शेअर करा

आचरा ,दि.०५ सप्टेंबर (अर्जुन बापर्डेकर)

श्रीकृष्ण मंदिर दक्षिणवाडा, आचरा पिरावाडी, श्री राधाकृष्ण मंदिर कृष्णनगर पिरावाडी आणि श्री कुबल कुटुंबीय यांच्या वतीने आचरा पिरावाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी श्रीकृष्ण मंदिरात मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजन, पोथी वाचन, आरती, भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले. ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात श्रीकृष्ण नामाच्या जयघोषाने पिरावाडी नगरी दुमदुमून गेली होती. यावेळी संपूर्ण पिरावाडीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या सोहळ्यास राधाकृष्ण मंदिर देवस्थान पिरावाडी तर्फे विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.देवस्थान न्यासाचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी यांनी उपस्थित राहता न आल्याने शुभेच्छा संदेश पाठवून प्रार्थना व्यक्त केली होती.
शनिवारी दुपारनंतर श्रीकृष्ण विसर्जन सोहळ्यास सुरुवात झाली होती.
सायंकाळी उशिरापर्यंत सर्व विसर्जन सोहळे शांततेत पार पडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी संजय कातीवले यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

शेअर करा