आचरा : कु.वेदान्त च्या वाढदिवशी केले गेले वृक्षारोपण

शेअर करा

सलग दहाव्या वर्षीही वक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासाठी केला अनोखा उपक्रम


आचरा,दि.०६ जुन (अर्जुन बापर्डेकर)

निसर्गाच्या बदलत्या स्थितीला पर्यावरणाची होणारी -हास कारणीभूत असूनही विकासाच्या नावाखाली आपण हजारो झाडांची कत्तल करत आहोत. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे बनले आहे.या दृष्टीनेच कु वेदान्त बापर्डेकर च्या वाढदिवशी दरवर्षी वक्षारोपण, रोपांचे वाटप करत पर्यावरण संवर्धनासाठी बापर्डेकर कुटूंबीय खारीचा वाटा उचलत आहेत.
शुक्रवारी पाच जूनला याचीच पुनरावृत्ती करत
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेदान्त बापर्डेकरच्या दहाव्या वाढदिवशी पोदार इन्टर नॅशनल स्कूल ,तसेच कोरल अपार्टमेन्ट मध्ये वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पोदार स्कूल मध्ये
प्रिन्सिपल राणीमारीया झेविअर
यांसह शिक्षक सोमनाथ कुंभार,हनुमंत तांबट यांसह अन्य शिक्षक
विद्यार्थी आदी उपस्थित होते.
तसेच कणकवली येथील कोरल अपार्टमेंटच्या आवारात कडूनिंबाचे वृक्षारोपण केले गेले.यावेळी सौ अंजली बापर्डेकर, दत्ता डेगवेकर, संदीप ताम्हणकर
यांसह अन्य कोरल अपार्टमेंटचे सदस्य आदीउपस्थित होते.

शेअर करा