आचरा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा गाऊडवाडी येथे वृक्षारोपण

शेअर करा

आचरा,दि.०६ जुन (अर्जुन बापर्डेकर)


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आचरा गाऊडवाडी येथे ग्रामपंचायत आचरा मार्फत वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी शाळा परिसरात अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली. त्यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी ग्रा.प. सदस्या सौ. श्रुती सावंत, सौ. किशोरी आचरेकर, ग्रामस्थ अभय भोसले,कृषी सहाय्यक राधेश्याम डाखोरे, अंगणवाडी सेविका सौ. रक्षा पाटील, मदतनीस सौ. आचरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

शेअर करा