आंबोलीतील धोकादायक पर्यटनस्थळांवर सुरक्षा रक्षक नेमा; पत्रकार अनिल चव्हाण यांची मागणी

शेअर करा

कावळेसाद व महादेवगड पॉईंटवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, स्पीकरद्वारे सूचना आणि पोलिसांकडे निवेदन सादर

आंबोली ,दि.०६ ऑगस्ट

पर्यटन स्थळावरील सुरक्षेसाठी पोलिसांनी सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी येथील पत्रकार अनिल चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. आंबोली पर्यटन स्थळावर पर्यटक अपघात घडण्याचे प्रकार बऱ्याचदा घडतात. बऱ्याचवेळा आणखी अनुचित प्रकार होतात. कुटुंबिक पर्यटक तसेच कपल तसेच पर्यटक यांना सुरक्षा वाटावी.यासाठी पोलिसांनी सरकारी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता आहे. आंबोली हा दुर्गम भाग आहे आणि पॉईंट हे वस्ती पासून लांब आहेत त्यामुळे देखरेख राहत नाही. इतर ठिकाणी जवळपास वस्ती असते आणि रेलचेल असते.अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक असतात. स्पीकर घेऊन आवश्यक सूचना देतात.काही प्रसिद्ध मंदिरात देखील स्पीकर वर आवश्यक सूचना देतात. ज्या ठिकाणी गर्दी असते तेथे अशा सूचना असतात. आंबोलीत कावळेसाद महादेवगड येथे अशा सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यामुळे अनुचित प्रकार रोखण्याबरोबर पर्यटकामध्ये कौटुंबिक आणि महिला पर्यटकामध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी धोकादायक पॉईंट वर सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबत चे निवेदन हवालदार लक्ष्मण काळे आणि एस.बी.गलोले यांच्याकडे दिले आहे.

शेअर करा