Atul Raorane – वाढदिवस विशेष : अतुल रावराणेंची सामाजिक बांधिलकी जपणारी प्रेरणादायी वाटचाल

शेअर करा

भैरी भवानी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रम राबवणारी संस्था

सिंधुदुर्ग,दि.१८ सप्टेंबर

कोकणातील समाजकारणात व राजकारणात नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासणारे काही नेतृत्व काम करतात. त्यामध्ये भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांची कामगिरी समाजाला आधार देणारी आहे. गेल्या काही वर्षामध्ये सामाजिक राजकीय जीवनात अतुल रावराणे यांनी लोकाभिमुखपणे उभे केलेले काम खरोखरच प्रेरणादायी आहे. नेहमी भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात ते देत असतात. गेल्या 4-5 वर्षात कणकवली विधानसभा क्षेत्रामध्ये शेतक-यांसाठी दरवर्षी 10 ते 12 हजार काजू रोपे देण्याचे अभिनव उपक्रम अतुल रावराणे यांनी राबवला. आता सहकारी काजू कारखाना सुरु करण्याचा संकल्प अतुल रावराणे यांनी केला आहे. त्यामुळे ख-या अर्थाने शेतक-यांना आर्थिक समृध्दीच्या दिशेने नेण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त घेतलेला समाजकार्याचा आढावा…

शेतकऱ्यांना काजू कारखान्यात ५० टक्के भागीदारी –


करुळ येथील काजू प्रकल्पात प्रक्रिया उद्योग प्रकल्प भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु होत आहे. याठिकाणी काजू शेतक-यांना 50 टक्के भागीदारी घेण्यात येणार आहे. भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी मागील काळात शेतक-यांना शब्द दिला होता. त्यानुसार काजू कारखाना सहकारी तत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेत करुळ येथील कणकवली फोंडा महामार्गालगत काजू प्रक्रिया प्रकल्प खरेदी केला आहे. या प्रकल्पात स्वत:च्या बागांचे देणा-या शेतक-याला 50 टक्के भागीदारी भागदारक म्हणून घेतले जाणार आहे. हा सिंधुदुर्गातील शेतक-यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.

स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मितीचा प्रयत्न –


कोविडमध्ये बाहेरगावी असलेले अनेक तरुण सिंधुदुर्गात परतले होते. या परिस्थितीत जिल्ह्यातील पारंपरिक पिकांना चालना देऊन स्थानिक पातळीवर रोजगार आणि उत्पन्नाची साधने निर्माण करण्याची संकल्पना होती. त्यातून काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सुमारे ५० हजार काजू कलमे तसेच सेंद्रिय खताचे वाटप करण्याचा उपक्रम भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी राबवला आहे. ज्‍या शेतक-यांनी आमच्‍याकडून काजू कलमे नेलीत, त्‍यांनी भागधारक बनण्‍याची संधी आहे. यामध्ये कोणतेही शुल्‍क असणार नाही. शिरगांव येथील तावडे हॉटेल, वैभववाडी अतुल रावराणे यांचे निवासस्थान , दर्शन कॅश्‍यू कारखाना करुळ किंवा कणकवली येथील कार्यालयात अर्ज स्विकारले जात आहेत. या कारखान्याच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून या संचालक मंडळात समीर रावराणे अध्यक्ष, सुरेंद्र तावडे उपाध्यक्ष, अतुल रावराणे, रोहन रावराणे, सुहास गुरव, दीपक बाईत, धुळाजी काळे, चारुलता रावराणे , नलिनी पाटील यांचा समावेश आहे. या हंगामात शेतकऱ्यांना स्वतःचा काजू कारखाना सुरु होणार असून ख-या अर्थाने शेतक-यांना हमीभाव देण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे.

पहिलेच फणस प्रक्रिया युनिट-


सिंधुदुर्गातील शेतक-यांच्या फणसाला कवडी मोलाचा भाव तर काही फणस कुजुन पडतात. मात्र, त्या फणसाला चांगला भाव मिळवून देत शेतक-याला समृध्द बनवण्याचे स्वप्न बाळगून भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी फणस प्रक्रिया सुरु करण्याचा निर्धार केला आहे. गावागावांत शेतक-यांचे फणस वाया जात असल्याने या फणस प्रक्रिया युनिटमुळे आर्थिक चालना अर्थव्यवस्थेला मिळणार आहे.अतुल रावराणे यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा प्रयत्न ठेवला आहे.


भैरी भवानी प्रतिष्ठान बनले अनेकांचा आधार –


भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे हे केवळ एका संस्थेचे अध्यक्ष म्हणून नव्हे, तर समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन विधायक कार्य उभे करणारे नेतृत्व आहे. आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. सामाजिक बांधिलकी, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक इच्छा या गुणांच्या बळावर त्यांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरू ठेवली आहे. भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही सामाजिक कार्य केवळ प्रसिद्धीसाठी न करता त्यामागे समाजहिताची भूमिका असावी, असा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे त्यांच्या वाटचालीतून दिसून येते.

भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे हे समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत, माणुसकीचा धागा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होते. त्यामुळेच अतुल रावराणे यांचे नेतृत्व भविष्यात शेतकरी कष्टकरी समाजाला रोजगाल देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

शेअर करा